स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत आता १ मे रोजी महाराष्ट्र दिनी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ध्वजारोहण करण्याची तयारी सुरू झाली आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत अनेक गैरसमज पसरवण्यात आले असून लहान राज्य सक्षम होऊ शकत नाही, असेही काहींचे म्हणणे आहे. ‘व्ही कॅन’द्वारा विदर्भ आंदेलनासाठी तयार करण्यात आलेल्या झेंडय़ाद्वारे याला सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. व्याघ्रभूमी म्हणून वाघाचे कातडे, खनिज संपदा दर्शवणारा काळा, वन संपदेचा हिरवा, मुबलक विजेचा सिम्बॉल, विदर्भाचा नकाशा आणि जय विदर्भ ही घोषणा या झेंडय़ावर दर्शवण्यात आली आहे. याशिवाय भारताच्या तिरंग्याचेही यावर प्रतीक आहे. एकूणच विदर्भ राज्य हे किती सक्षम आहे, हे या झेंडय़ावरून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आता ‘व्ही कॅन’ने एल्गार पुकारला आहे. त्या अंतर्गत १ मे रोजी महाराष्ट्र दिनी संपूर्ण विदर्भातील जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. विदर्भातील अकारही जिल्ह्य़ांत ध्वजारोहणाची जय्यत तयारी सुरू आहे. नागपुरात १ मे रोजी सेंट्रल बाजार रोडवरील विष्णूजी की रसोई, येथे सकाळी ९ वाजता करण्यात येईल. याचसोबत भंडारा येथील शंकरनगर ग्रऊंड, गोंदियातील सिव्हिल लाईन्स येथील जे.एम. हायस्कूल जयस्तंभ येथे ध्वजारोहण करण्यात येईल.
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ‘विदर्भ कनेक्ट’ ही चळवळ काही महिन्यांपूर्वी सुरू झाली. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात व्ही कॅनने विविध पक्षांच्या उमेदवारांकडून विदर्भाच्या कटिबद्धतेसाठी वचननामा भरून घेतला होता. ध्वजारोहणानंतर मोटारसायकल रॅली काढण्यात येईल. जनजागरणासाठी निबंध स्पर्धा घेण्यात येणार असून विदर्भाच्या चळवळीत तरुणांचा सहभाग वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन अखंड महाराष्ट्र समितीच्या वतीने ‘मराठी अस्मिता दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. क्रांतिकारक सेनापती पांडुरंग बापट  यांच्या उत्तर अंबाझरी मार्गावरील पुतळ्याच्या साक्षीने हा कार्यक्रम होईल. ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे, लेखिका आशा बगे आणि ज्येष्ठ पत्रकार सोपान पांढरीपांडे याप्रसंगी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते १ मे रोजी सकाळी साडेआठ वाजता क्रांतिकारक पांडुरंग बापट यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले जाईल. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. त्यानंतर ‘संयुक्त महाराष्ट्राची एकसंघता तसेच मराठी अस्मिता’ या विषयांवर मान्यवरांची व्याख्याने होतील. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. वि.स. जोग, प्रमोद सोवनी, मधुकर कुकडे, समीर जाधव, सुधाकर जगम, मोहन शर्मा आदींनी केले आहे.