महारष्ट्र विकास सेवेतील वर्ग १चे ५५ अधिकारी आणि ३५२ गटविकास अधिकारी यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. नागपूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण)प्रभू थुटे, भंडाऱ्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(महिला व बालकल्याण) सुधीर वाळके, भंडाऱ्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)राजेश कुळकर्णी यांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे.
रोहयो विभागात विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. फुटाणे यांची बदली उपमुख्य कार्यकारी म्हणून तर नागपूर जिल्हा परिषदच्या सामान्य प्रशासन विभागात डॉ. फुटाणे यांच्या जागेवर थुटे यांची बदली करण्यात आली.
भंडाऱ्यातच सामान्य प्रशासन विभागात त्याच पदावर वाळके यांना पाठविण्यात आले. गोंदिया येथे त्याच पदावर कुळकर्णी यांना पाठविण्यात आले. राज्यशासनाने एकूण ५५ उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी, ३० मे ला जारी केले आहे. तसेच राज्यातील सर्व ३५२ पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांचे पद हे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला होता. सध्या सीडीपीओ व गटविकास अधिकारी वर्ग-२ पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची सहायक गटविकास अधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे.
सहायक गटविकास अधिकारी या पदावर नागपूर जिल्ह्य़ातील सीडीपीओ व गटविकास अधिकारी वर्ग-४ यांच्या बदल्या करण्यात आल्या. गडचिरोली येथील कोरची पंचायत समितीमध्ये सावनेरचे बीडीओ दिलीप भगत यांची बदली सहायक गटविकास अधिकारी पदी करण्यात आली. मौदा येथे गडचिरोलीचे एस.डी. भारसाकळे यांना पाठविण्यात आले. पंचायत समिती तिरोडा येथे सावनेरचे सीडीपीओ सी.डी. मुन यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोहन चवरे यांनी दिली.

Story img Loader