छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या २०० बसेस मागविण्यात आल्या असून तोटय़ात धावत असलेल्या एसटीला यामुळे काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
राज्यात शहर असो वा गाव तेथे एसटी बस जाते. राज्यभरात एसटीच्या १५ हजाराहून अधिक बसेस रोज धावतात. एसटी आधीच तोटय़ात आहे. डिझेल व वाहनांच्या सुटय़ा भागांमध्ये वाढ झाली. कर्मचाऱ्यांसोबत नुकताच करार झाला आहे.  त्यातच प्रवासी कमी झाल्याने भाडेवाढ केली तरी एसटी आणखीच तोटय़ात गेली आहे. छत्तीसगड राज्यात विधानसभेची निवडणूक होत असून त्यासाठी २०० बसेस मागविण्यात आल्या आहेत. आजपासून २३ नोव्हेंबपर्यंत असे वीस दिवस या बसेस छत्तीसगडमध्ये धावणार आहेत. त्यातून पाच कोटीहून अधिक भाडे एसटीला मिळणार आहे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक बसवर एसटीला सुमारे वीस हजार रुपये मिळतील. त्यामुळे आधीच तोटय़ात असलेल्या एस.टी. ला काही अंशी दिलासा मिळणार आहे. संपूर्ण भाडे भरल्यानंतरच या बसेस छतीसगड राज्यात रवाना होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा