शालेय व महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा
डी. डी. बिटको शाळेच्या मुलांनी तीन गटांमध्ये विजेतेपद पटकावीत येथे यशवंत व्यायामशाळेच्या वतीने आयोजित २३ व्या शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धेत बहारदार कामगिरी केली.
स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा राज्याच्या क्रीडा विभागाचे सहसंचालक दिलीप सोपल, राज्य क्रीडा विभागाचे अप्पर सचिव सतीश जोंधळे, उपसंचालक माणिक ठोसरे, विभागीय उपसंचालक जगन्नाथ आधणे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुधीर मोरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी सोपल यांनी व्यायामशाळेचा शाळा-महाविद्यालयांच्या खेळाडूंसाठीचा हा उपक्रम अत्यंत स्त्युत्य असून अशा उपक्रमांव्दारेच खेळांची वाढ होण्यास मदत होत असल्याचे सांगितले. स्पर्धेत १४, १७, १९ वर्षांआतील आणि वरिष्ठ महाविद्यालय, अशा आठ गटात १०८ संघांनी सहभाग नोंदविला. मुलांमध्ये १७, १९ आणि वरिष्ठ अशा तीन गटाचे विजेतेपद डी. डी. बिटको संघाने पटकावले तर १४ वर्षे वयोगटात त्यांना उपविजेतेपद मिळाले.
या गटात टी. जे. चौहान तसेच सिडको संघाने विजेतेपद पटकावले. मुलींच्या विभागात नाशिक रोडच्या र. ज. बिटको संघाने १४ व १७ वर्षे वयोगटाचे विजेतेपद पटकावले. बिटको सघाने १९ वर्षांआतील तर केटीएचएम संघाने वरिष्ठ महाविद्यालय गटाचे विजेतेपद पटकावले.
विविध गटात मुलांमध्ये अक्षय मोरे, इमॅन्युअल अँथोनी, गणेश भडांगे, हेमंत पाटील, अमय ठक्कर, चैतन्य काळे, गणेश बेळेकर, तर मुलींमध्ये पूर्वा परदेशी, किरण शिंदे, प्रतीक्षा बस्ते आदींनी परिश्रम घेतले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा