‘महावितरण’ने सुरू केलेल्या ६५०० विद्युत सहायकांच्या भरतीसाठी न्यायालयीन निकालामुळे आता ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ऐवजी एकूण गुणांची सरासरी गृहित धरली जाणार आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांनी दोन नोव्हेंबपर्यंत सरासरी गुणांची नोंदणी करावी, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.
‘महावितरण’च्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्जाचा नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून सर्व विषयांमध्ये मिळालेले गुण, आणि एकूण गुणांची सरासरी नोंदविण्यासाठी उमेदवार योग्य तो बदल करू शकतात. हा बदल करण्यासाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबपर्यंत कंपनीच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर उमेदवारांना कोणताही बदल करता येणार नाही.
‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ची पद्धत जुनी दहावी झालेल्यांसाठी योग्य नाही अशी भूमिका घेत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झालेली होती. त्याप्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार एकूण गुणांची सरासरी गृहीत धरण्यात येणार आहे.

Story img Loader