सांगली जिल्ह्यात फक्त शेतीपंपाच्या ५० कोटींच्या थकबाकीमुळे महावितरण आíथक अडचणीत सापडले आहे.  शेतक-यांनी किमान चालू बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर परिमंडलचे मुख्य अभियंता रमेश घोलप यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यात मार्च २०१३पासूनच्या चालू शेतीपंपांच्या बिलांची थकबाकी ही ५० कोटींची घरात आहे. त्यामुळे महावितरण अडचणीत आहे. ही थकबाकी वसूल व्हावी यासाठी आता महावितरण कंपनीने शेतक-यांना चालू बिल भरण्याचे आवाहन केले आहे. सांगली आणि कोल्हापूर हे दोन जिल्हे आता भारनियमनमुक्त झाले असून दोन्हीही जिल्ह्यांत कुठेही भारनियमन केले जात नाही असा दावाही महावितरणने केला आहे.
दुष्काळी स्थितीमुळे सांगली जिल्ह्यातील शेतक-यांची वीजबिलांची मोठी थकबाकी आहे. मात्र आता चांगला पाउस झाल्याने शेतक-यांनी किमान चालू बिले भरावीत असे आवाहनही कोल्हापूर परिमंडलचे मुख्य अभियंता रमेश घोलप यांनी केले आहे. जर चालू बाकीही भरली नाही तर शेतीपंपाचे कनेक्शन तोडण्याचा इशाराही महावितरणने दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitaran is economic pressure due to agriculture pump electricity arrears