महायुतीच्या सभेची निमंत्रणपत्रिका घेऊन खासदार गोपीनाथ मुंडे शुक्रवारी सायंकाळी नगर रस्त्यावरील चहाच्या टपरीवर दाखल झाले. लक्ष्मण मस्के या चहावाल्याने प्रचारासाठी मुंडेंना ११० रुपयांचा निधी दिला. पाच ठिकाणी चहाच्या गाडय़ांवर जाऊन मुंडेंनी मेळाव्याचे आवतन देत चहाचा झुरकाही मारला.
येथे रविवारी महायुतीची दुसरी सभा होणार असून, सभेत चहावाल्यांना खास निमंत्रण आहे. शुक्रवारी पत्रकार बठक आटोपल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुंडे निमंत्रणपत्रिका घेऊन नगर रस्त्यावरील मस्के यांच्या टपरीवर गेले. लोकसभेतील भाजपचे उपनेते टपरीवर आल्याने चहावाल्यांनीही आदरातिथ्य दाखवत त्यांना चहा घेण्याचा आग्रह केला. मुंडेंनी टपरीच्या बाजूला खुर्चीवर बठक मारून चहाचा आस्वाद घेतला. मस्के यांनी ११० रुपये मुंडेंकडे देऊन पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना देण्याची विनंती केली. त्यानंतर मुंडेंनी याच रस्त्यावरील शेख यांच्या टी पॉइंटवर व रस्त्याच्या बाजूला असलेल्या आणखी ४ टपऱ्यांवर जाऊन मेळाव्याचा विशेष पास चहावाल्यांना दिला. मुंडेंच्या अनोख्या भेटीने चहावालेही भारावून गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा