भाजप-शिवसेना महायुतीची अमरावतीतली पहिली जाहीर सभा येत्या १४ मार्चला येथील सायन्सकोर मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि योगगुरू रामदेव बाबा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या सभेने अमरावतीत आनंदराव अडसूळ यांच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे योगगुरू रामदेव बाबा यांच्या निकटचे मानले जातात. मात्र, त्यांनाच प्रचाराला बोलावून नवनीत राणा यांना शह देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. काही दिवसांपूर्वीच रामदेव बाबा आणि आनंदराव अडसूळ यांची मुंबईत भेट झाली होती.

Story img Loader