कर्जत शहरात काल रात्री झालेल्या बैठकीत टपरीधारक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब साळुंके यांची निवड करण्यात आली. दरम्यान या व्यवसायिकांनी स्वत:च सर्व अडथळे दुर केले केल्याने मेन रोड चांगलाच रूंद झाला आहे.
शहरात सध्या अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू आहे. त्याविषयी उलटसुलट चर्चा होत आहे. बैठकीत पत्रकार गणेश जेवरे यांनी याबाबतच्या निर्णयाची सविस्तर माहिती दिली. मच्छिंद्र अनारसे यांनी टपरीधारंकाच्या सुचना काय वाचून दाखवल्या, नारायण दळवी यांनी बाह्य़वळण रस्ता नकाशा तयार आहे, त्याचा पाठपुरावा करावा असे आवाहन केले. महेश जेवरे, रावसाहेब खराडे, प्रशांत ढेरे यांच्यासह अनेकांनी सुचना मांडल्या. साळुंके यांनी यावेळी टपरीधारकांची जबाबदारी व प्रशासनाची भुमीका मांडली. प्रांताधिकारी संदीप कोकडे दिलेला शब्द पाळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील सर्व रस्त्यांवर बाहेर आलेल्या शेड व ओटे काढून घ्यावेत असे आवाहान कोकडे यांनी केले.

Story img Loader