एकीकडे फॅशन शोमध्ये रॅम्पवरचे कपडे लाखो रुपयांना विकत घेतले जात असताना त्याच प्रकारची डिझाइन पुढच्याच आठवड्यात फॅशन स्ट्रीटला अगदी किरकोळ दरात उपलब्ध होते. फॅशनच्या बाबतीत नेहमीच अप टू डेट राहणारी ही गल्ली आता व्यवसाय व पादचारयांच्या सोयीसाठीही अप टू डेट होत आहे.
दक्षिण मुंबईत चर्चगेट स्टेशनपासून अगदी दोन मिनिटांवर असलेल्या फॅशन स्ट्रीटवर कॉलेजच्या मुलामुलींची नेहमीच गर्दी असते. फुटपाथवर मांडलेले स्टॉल आणि ते घेण्यासाठी उडालेली झुंबड अनेकदा वाहतुकीसाठी तसेच पादचारयांसाठी त्रासदायक ठरतात. याच परिसरात असलेल्या आझाद मदान आणि क्रॉस मदानात फिरायला येणारयांसाठी तसेच व्हीटी ते सीएसटी पायी जाणाऱ्यांसाठीही ही गल्ली अडचणीची ठरते. पालिकेकडून अनेक वष्रे कारवाई होऊनही ही दुकाने आणि त्यांची लोकप्रियता कायम राहिली आहे. त्यामुळे ही दुकाने आणि फुटपाथ दोन्हींसाठी उपयुक्त ठरणारा मधला मार्ग पालिकेने दोन वर्षांपूर्वी शोधून काढला. आता तो अंतिम टप्प्यावर आला असून दोन महिन्यात फॅशन स्ट्रीटच्या सुशोभीकरणाला सुरुवात होणार आहे. फॅशन स्ट्रीटला लागून असलेले क्रॉस मदान आणि जवळचे आझाद मदान ही दोन्ही ठिकाणी पुरातन वारसा श्रेणी एकमध्ये मोडत असल्याने त्यांच्या 100 मीटर परिसरादरम्यानच्या कोणत्याही कामासाठी पुरातन वारसा समितीकडून मान्यता मिळवणे आवश्यत ठरते. पालिकेकडून तसा प्रस्ताव समितीकडे पाठवण्यात आला आणि समितीने त्याला तत्वत मान्यताही दिली आहे. या सुशोभीकरणामुळे मदानांवर कोणताही परिणाम होणर नसल्याचे स्पष्ट करून ही मान्यता देण्यात आली आहे.
पुढील दोन महिन्यात सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात येत असून या रस्त्यावरील 383 फेरीवाल्यांची दुकाने योग्य पद्धतीने लावली जातील. त्यामुळे क्रॉस मदानाची िभतही मोकळी होईल व फुटपाथ मोकळा झाल्याने पादचारयांना चालताना अडचणी येणार नाहीत. क्रॉस मदानापासून मेट्रो सिनेमापर्यंत जाणारया या मार्गावर पालिका प्रकाशासाठी दिवेही लावणार आहे. तसेच पालिकेच्या चौकी इतरत्र हलवण्यात येणार असून अनधिकृत बांधकामे तोडली जातील.
सध्या एकाच दिशेने असलेली दुकाने एकमेकांसमोर उभी केली जाणार आहेत. त्यामुळे खरेदी करणाऱ्यांनाही फायदा होईल तसेच फुटपाथ मोकळा झाल्याने चालणाऱ्यांनी अडचण होणार नाही. काही ठिकाणी तुटलेला फुटपाथ नीट केला जाणार असून अनधिकृत पाìकग करणारया गाड्यांसाठी सूचना फलकही लावले जातील. त्यामुळे या रस्त्यांवर सध्या दिसत असलेला गोंधळ कमी होईल व सर्वानाच फायदा होईल, अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकारयांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा