ठाणे शहरातील वेगवेगळ्या परिसरांत मोठय़ा प्रमाणात साथीचे आजार पसरल्याने स्वच्छतेचा तसेच नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहरात मलेरियाच्या रुग्णसंख्येत सुमारे १५ ते २० टक्क्य़ांनी वाढ झाली असली तरी सुदैवाने एकही रुग्ण दगावलेला नाही. सध्या डेंग्यू, स्वाइन फ्ल्यू तसेच लेप्टो यांसारख्या आजारांचे रुग्ण शहरात मोठय़ा प्रमाणात आढळले नसले तरी, गेल्या सहा महिन्यात लेप्टोमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच डेंग्यू आणि स्वाइन फ्ल्यूसदृश प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, शहरात साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी दरवर्षीप्रमाणेच यंदाही आरोग्य विभागाने बांधकाम व्यावसायिक तसेच गॅरेजवाल्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
जानेवारी ते जुलै या महिन्यात ४९ हजार ९७५ जणांच्या रक्तांचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली असून त्यात एक हजार २८६ मलेरियाचे रुग्ण आढळून आले. यंदा जूनमध्ये
१५० तर जुलै महिन्यात मलेरियाचे ३६६ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी ५४ हजार ५४१ जणांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले होते. त्यात १७२ मलेरियाचे रुग्ण आढळले होते.
तसेच जून महिन्यात १४८ तर जुलै महिन्यात ३६६ मलेरियाचे रुग्ण आढळले होते. एकंदरीतच, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मलेरियांच्या रुग्णांमध्ये १५ ते २० टक्क्य़ांनी वाढ झाल्याचे
दिसून येते. यंदा जानेवारी ते जुलै या महिन्यात डेंग्यूसदृश
६९ रुग्ण आढळले होते. त्यातील एकाला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच ६९ पैकी २० जणांचा वैद्यकीय अहवाल अद्याप आलेला नाही. गेल्या वर्षभरात ७० डेंग्यूसदृश रुग्ण आढळले होते. त्यापैकी पाच जणांना लागण तर एकाचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी शहरात स्वाइन फ्ल्यूसदृश असलेले १४ रुग्ण आढळले होते. मात्र, यंदा जून महिन्यात स्वाइन फ्ल्यूचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. गेल्या वर्षी लेप्टोचे २२ रुग्ण आढळले होते, त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला होता. यंदा जानेवारी ते जुलै या महिन्यात लेप्टोचे दहा रुग्ण सापडले असून त्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यंदा जून आणि जुलै महिन्यात दोघांचे मृत्यू झाले आहेत, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली. ठाणे शहरातील पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर सुरू करण्यात आलेली नालेसफाई काहीशी उशिरा सुरू झाल्याची तसेच ती चांगल्या प्रकारे झालेली नसल्याची ओरड सर्वसामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून
होत होती. मध्यंतरी, घंटागाडी कामगारांच्या संपामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. या सर्वामुळेच शहरातील आरोग्य धोक्यात आल्याची चर्चा आता शहरात सुरू झाली आहे.

खबरदारी आणि जनजागृती
शहरात साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने २७३ टायर पंक्चरची दुकाने आणि २८९ नव्याने बांधकाम सुरू असलेल्या विकासकांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच आरोग्यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपायांविषयी गृहसंकुलांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

malaria disease spreading in thane
malaria ,malaria in thane
आता मलेरियाचे ठाणे..!
ल्ल    रुग्णसंख्येत
२० टक्क्य़ांची वाढ
ल्ल    बांधकाम व्यावसायिक व गॅरेजवाल्यांना नोटिसा
प्रतिनिधी, ठाणे
ठाणे शहरातील वेगवेगळ्या परिसरांत मोठय़ा प्रमाणात साथीचे आजार पसरल्याने स्वच्छतेचा तसेच नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहरात मलेरियाच्या रुग्णसंख्येत सुमारे १५ ते २० टक्क्य़ांनी वाढ झाली असली तरी सुदैवाने एकही रुग्ण दगावलेला नाही. सध्या डेंग्यू, स्वाइन फ्ल्यू तसेच लेप्टो यांसारख्या आजारांचे रुग्ण शहरात मोठय़ा प्रमाणात आढळले नसले तरी, गेल्या सहा महिन्यात लेप्टोमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच डेंग्यू आणि स्वाइन फ्ल्यूसदृश प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, शहरात साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी दरवर्षीप्रमाणेच यंदाही आरोग्य विभागाने बांधकाम व्यावसायिक तसेच गॅरेजवाल्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
जानेवारी ते जुलै या महिन्यात ४९ हजार ९७५ जणांच्या रक्तांचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली असून त्यात एक हजार २८६ मलेरियाचे रुग्ण आढळून आले. यंदा जूनमध्ये
१५० तर जुलै महिन्यात मलेरियाचे ३६६ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी ५४ हजार ५४१ जणांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले होते. त्यात १७२ मलेरियाचे रुग्ण आढळले होते.
तसेच जून महिन्यात १४८ तर जुलै महिन्यात ३६६ मलेरियाचे रुग्ण आढळले होते. एकंदरीतच, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मलेरियांच्या रुग्णांमध्ये १५ ते २० टक्क्य़ांनी वाढ झाल्याचे
दिसून येते. यंदा जानेवारी ते जुलै या महिन्यात डेंग्यूसदृश
६९ रुग्ण आढळले होते. त्यातील एकाला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच ६९ पैकी २० जणांचा वैद्यकीय अहवाल अद्याप आलेला नाही. गेल्या वर्षभरात ७० डेंग्यूसदृश रुग्ण आढळले होते. त्यापैकी पाच जणांना लागण तर एकाचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी शहरात स्वाइन फ्ल्यूसदृश असलेले १४ रुग्ण आढळले होते. मात्र, यंदा जून महिन्यात स्वाइन फ्ल्यूचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. गेल्या वर्षी लेप्टोचे २२ रुग्ण आढळले होते, त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला होता. यंदा जानेवारी ते जुलै या महिन्यात लेप्टोचे दहा रुग्ण सापडले असून त्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यंदा जून आणि जुलै महिन्यात दोघांचे मृत्यू झाले आहेत, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली. ठाणे शहरातील पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर सुरू करण्यात आलेली नालेसफाई काहीशी उशिरा सुरू झाल्याची तसेच ती चांगल्या प्रकारे झालेली नसल्याची ओरड सर्वसामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून
होत होती. मध्यंतरी, घंटागाडी कामगारांच्या संपामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. या सर्वामुळेच शहरातील आरोग्य धोक्यात आल्याची चर्चा आता शहरात सुरू
झाली आहे.

खबरदारी आणि जनजागृती
शहरात साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने २७३ टायर पंक्चरची दुकाने आणि २८९ नव्याने बांधकाम सुरू असलेल्या विकासकांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच आरोग्यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपायांविषयी गृहसंकुलांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

Story img Loader