सांगली महापालिकेच्या मिरज विभागातील मालमत्ता कर वसुलीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी कर्मचारी अमर शंकर अंकलगी याला निलंबित केले असल्याचे उपायुक्त नितीन कापडणीस यांनी सोमवारी सांगितले.
अमर अंकलगी हा कर्मचारी मालमत्ता विभागाकडे घरपट्टी वसुलीसाठी होता.  जुल २०१२ ते मार्च २०१३ या दरम्यान घरपट्टीची वसूल केली. ३३ जणांची १ लाख १८ हजार ७८७ रुपये एवढी रक्कम त्याने स्वतसाठी वापरली होती.  गरव्यवहार उघडकीस येताच त्याचे दंडासह होणारी वसुलीची रक्कम १ लाख ६६ हजार ७७१ रुपये ही महापालिकेकडे जमा केली आहे. मात्र अद्याप ७४ हजार ९३९ रुपये ही रक्कम १८ जणांची करवसुली भरणा केलेली नाही.
मिरजेतील मिळकत धारक श्री. स्वामी यांनी महापालिकेचा कर भरूनही थकबाकीची नोटीस आल्यानंतर या संदर्भात जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.  या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकार्याची चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी करून उपायुक्त कापडणीस यांनी आज अंकलगी यांना निलंबित केले आहे.