भाविक आणि पर्यटकांची गैरसोय
..तर ठाणेकरांसाठी पर्वणीच
ठाणे येथील येऊर या घनदाट वनराईने बहरलेल्या परिसराला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यासाठी महापालिकेकडून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असून, त्यास मंजुरी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी हिल पर्यटन विकास करण्यात येणार आहे. तसेच या डोंगराजवळच प्राचीन पीर हजरत मामू-भांजे या दग्र्यास ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे दग्र्यास तीर्थ आणि येऊरला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाल्यास ती ठाणेकरांसाठी पर्वणीच असले.

ठाणे येथील येऊर डोंगराजवळील प्राचीन हजरत पीर मामू-भांजे दर्गा तीर्थक्षेत्राची घोषणा होऊन अद्याप दुर्लक्षित आहे.    
दीड वर्षांपूर्वी राज्य शासनाने या दग्र्यास ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याची अजूनपर्यंत अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे ठाण्यातील हे धार्मिक तसेच पर्यटनस्थळ तीर्थक्षेत्र विकासाच्या प्रतीक्षेत आहे.
ठाणे येथील येऊर डोंगराजवळच पीर हजरत मामू-भांजे दर्गा असून, त्या ठिकाणी सर्वधर्मीय नागरिक मोठय़ा संख्येने येत असतात. या दग्र्यामुळेच डोंगराला मामा-भाचे डोंगर या नावाने ओळखले जाते. तसेच डोंगर भागात असलेल्या या दग्र्याबरोबरच भाविकांना निसर्गरम्य वातावरणाचा अस्वाद घेता येतो. दरवर्षी मे महिन्यात दग्र्याचा उरूस असतो, त्यावेळी भाविक मोठय़ा संख्येने येतात. मात्र या दग्र्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पायऱ्या नसल्याने भाविकांना अनेक अडचणींचा सामना करून दग्र्यामध्ये जावे लागते. तसेच तीन दिवस या दग्र्याचा उरूस सुरू असतो, त्या कालावधीत डोंगरामध्ये भाविकांसाठी वीज आणि  पाण्याची व्यवस्था ट्रस्टकडून करण्यात येते. मात्र, वन्यजीव प्राण्यांना त्रास होत असल्याने डोंगरामध्ये विद्युत व्यवस्थेस वन विभागाकडून हरकत घेण्यात येते. यातूनच ट्रस्ट पदाधिकारी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद होता. तसेच प्राचीन दग्र्याकडे राज्य शासनाचेही दुर्लक्ष होत असल्याने, मध्यंतरी मामू-भांजे या दग्र्यास तीर्थक्षेत्र आणि डोंगरास पर्यटनाचा दर्जा मिळावा, अशी मागणी ट्रस्टने राज्य शासनाकडे मागणी केली होती. तसेच त्यासंबंधी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. दरम्यान, जून २०११ मध्ये प्राचीन हजरत पीर मामू-भांजे या दग्र्यास तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय घेऊन त्याकरिता संबंधित विभागाकडे कागदपत्रे पाठविली. मात्र, अद्यापही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, अशी माहिती ट्रस्टचे सचिव नूर मोहम्मद मुजावर यांनी दिली. या दग्र्यास तीर्थक्षेत्राचा दर्जा लवकरात लवकर घोषित करून त्याचा विकास करण्यात यावा, यासाठी ठाण्यातील खासदार तसेच आमदारांनी संबंधित विभागाकडे पत्राद्वारे शिफारस केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

vasai virar municipal corporation Planning of development plan according to 10 sectors
विकास आराखड्याचे १० विभागानुसार नियोजन, आरक्षित भूखंडावर अतिक्रमणाबाबत महापालिकेचे मौन
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Deonar waste land for Dharavi project Revenue Department requests Municipal Commissioner to provide land
देवनार कचराभूमीची जमीन धारावी प्रकल्पाला; जमीन देण्याची महसूल विभागाची पालिका आयुक्तांना विनंती
GBS , Pune, Pune Municipal Corporation,
पुणे : शहरात ‘जीबीएस’चा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेने घेतले मोठे निर्णय!
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?
Replantation of 2097 trees for Thane Municipal Headquarters
६३१ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव; ठाणे महापालिका मुख्यालयासाठी २०९७ वृक्षांचे पुनर्रोपण
Nalasopara unauthorised building vasai virar municipal corporation
नालासोपाऱ्यातील अनधिकृत इमारतीवर कारवाईला सुरुवात, रहिवाशांचा आक्रोश
maharashtra awaits additional railway trains for maha kumbh mela
तीर्थक्षेत्र दर्शनासाठी राज्याला अतिरिक्त रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा; कुंभमेळ्यामुळे गाड्यांची कमतरता
Story img Loader