कोपरखैरणे पोलिसांनी पिस्तूल विक्री करणाऱ्या एका तरुणाला गुरुवारी कोपरखैरणे गावातून अटक केली आहे. त्याच्याकडून विदेशी बनावटीची दोन पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत. या पिस्तूल कोणाला विक्री करण्यात येणार होत्या याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उमर शेख असे या अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. खैरणे गावातील रहिवाशी असून, अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीसाठी तो डिलेव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्याच्याकडून दोन विदेशी पिस्तूल हस्तगत करण्यात आले असून त्यांची किंमत ६० हजारांपेक्षा अधिक असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक यांनी दिली आहे. तो कोणासाठी काम करतो आणि हे पिस्तूल कोणाला विक्री करण्यासाठी आणले होते याचा अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी अनधिकृतरीत्या पिस्तुलांची विक्री करणाऱ्यांविरोधात मोहीम उघडली आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ७ पिस्तुलांसह ७ जणांना अटक केली होती. त्या शिवाय ३ मेग्झीन व ११ जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.

Story img Loader