दारूसाठी पैसे न दिल्याचा राग येऊन गळा आवळून आईची हत्या केल्याची घटना तालुक्यातील पाटणे येथे घडली असून याप्रकरणी तालुका पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.
रविवारी सकाळी सगुणाबाई महारू खैरनार (६५) यांचा झोपेतच संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलिसांनीही प्रारंभी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली.
परंतु सगुणाबाईचा मुलगा रवींद्र यास दारूचे व्यसन असल्याने त्याचे आईशी नेहमी भांडण होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र रवींद्रभोवती फिरविले. शव विच्छेदनातही सगुणाबाई यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हे तर, गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी संशयित रवींद्रला हिसका दाखविल्यानंतर त्याने सर्व प्रकाराची कबुली दिली.
दारूसाठी रवींद्रला पैसे हवे होते. पैशांमुळे शनिवारी त्याचे सगुणाबाई यांच्याशी जोरात भांडण झाले. त्यामुळे संतापाच्या भरात आपण आईची गळा आवळून हत्या केल्याचे रवींद्रने सांगितले.

Story img Loader