आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी आळंदी देहू येथून निघालेल्या संतांच्या पालख्यांनी सोलापूर जिल्ह्य़ात आगमन केले असून सोहळ्यात अवघे सहा-सात दिवस उरले असून पंढरीत वारक ऱ्यांची, भाविकांची वर्दळ वाढली आहे.
येणाऱ्या लाखो भक्त वारकरी यांची सोय करण्याची जबाबदारी ही पंढरीचे महसूल प्रशासन पोलीस प्रशासन, अन पंढरपूर न. पा. यांच्यावर असून ही तिन्ही प्रशासने सज्ज आहेत. यात्रेसाठी पोलीस बंदोबस्तासाठी जिल्ह्य़ासह संपूर्ण महाराष्ट्रातून पोलीस, महिला पोलीस, गृह रक्षक दल दाखल झाले आहेत.
वारीचे निमित्ताने पंढरीत सुमारे ७० ते ८० हजार वारकरी असून गेले दोन दिवस सततच्या रिमझिम पावसाने तारांबळ उडवली, तर लहान मोठे व्यवसाय करणाऱ्यांनी दुकाने थाटण्यास सुरुवात केली त्यातही व्यत्यय आला.
वारीच्या निमित्ताने प्रदक्षणा मार्ग नवी पेठ, संत पेठ, गजानन महाराज मठ पिछाडी मार्ग आदींची वारक ऱ्यांच्या सोईसाठी तात्पुरती मलमपट्टी करून तयार केलेले रस्ते या पावसामुळे उखडले आहेत. या रस्त्यावर पुरेसे डांबर, बारीक खडी न वापरल्याने या रिमझिम पावसात रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत.  सर्वात मोठे बस स्थानक असलेल्या पंढरीच्या स्थानकाचीही दुर्दशा झाली आहे.

Story img Loader