डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात आंबा महोत्सव भरविण्यात आला आहे. या महोत्सवात देवगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरातील आंबा बागाईतदारांच्या बागांमधून आंबा आणून महोत्सवात विकण्यात येत आहे. २१ एप्रिलपर्यंत दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे.
मिलिंद आचरेकर यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. शेतक ऱ्यांचा मालाला थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि अशा महोत्सवातून दोन पैसे जास्त मिळावेत. दलालांच्या जाचातून सुटका व्हावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित केला असल्याचे संयोजकांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा