नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला आणि अस्सल कोकणातून खुद्द शेतकऱ्यांनी आणलेल्या हापूस आंबा महोत्सवास मंगळवारपासून नाशिकमध्ये सुरुवात होत आहे. महोत्सवात हापूस आंब्यासोबत विविध प्रकारचे लोणचे, सरबत, काजू व आमरस आदी आरोग्यदायी कोकणी उत्पादने मांडली जाणार आहेत.
मध्यवर्ती बस स्थानकालगतच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जुन्या इमारतीतील सभागृहात हा महोत्सव होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक अनिल चव्हाण व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विभागीय अधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ, जिल्हा बँकेचे प्रशासकीय मंडळ सदस्य तुषार पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. बाजारात मिळणारा हापूस आंबा अनेकदा कोवळा, पुडी लावून रासायनिक पद्धतीने पिकविला जातो. तसेच कुठूनही आलेला आंबा रत्नागिरी, देवगड हापूस नावाने खपविला जातो. या पाश्र्वभूमीवर, कोकण कृषी पर्यटन विकास संस्थेतर्फे अनेक वर्षांपासून नाशिक येथे आंबा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. कोकणातील निर्यातक्षम दर्जाचा हापूस आंबा नाशिककरांना उपलब्ध व्हावा, या उद्देशाने ही संकल्पना राबविली जात आहे. केवळ गवतात पिकविलेला आंबा या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. आंब्याबरोबर कोकणातील इतरही उत्पादने प्रदर्शनास उपलब्ध असतील. या संदर्भात अधिक माहितीसाठी संजय परब व दत्ता भालेराव यांच्याशी ९४२३९ ६८८६८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा