उन्हाळा सुरू झाल्यावर जिभेवर आंब्याची चव रेंगाळल्याशिवाय राहत नाही. त्या अनुषंगाने नवी मुंबई मुंबई र्मचट जिमखान्याने फळांचा राजा आंब्याचा ऋतू साजरा करण्याचे ठरविले आहे. येत्या १७ मे रोजी मँगो मेनिया फुड फेस्टिवल वाशीतील नवी मुंबई र्मचट जिमखाना येथे साजरा केला जाणार आहे. हा कार्यक्रम रंगतदार आणि आकर्षक करण्यासाठी कलावंत शेफ प्रसाद कुलकर्णी उपस्थित राहणार आहे. शेफ कुलकर्णी स्वादिष्ट मँगो रेसिपीसह कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. मँगो मेनिया फूड फेस्टिवलमध्ये सहभागी होणाऱ्यांनी स्वत: आंब्यापासून बनविलेल्या पाककृती बनविण्याची अट आहे. दोन विजेते निवडण्यात येणार असून शेफ कुलकर्णी यांनी निवडलेल्या सवरेत्कृष्ट पाककृतींना पारितोषिक देण्यात येणार आहे.प्रवेश विनामूल्य असून स्पधर्कानी ०२२-२७६५२२२१ यांवर संपर्क साधावा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in