महानगरपालिका सेवक सहकारी पतसंस्थेची प्रकाश कदम यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन अध्यक्षपदी मनीषा पाटेकर, उपाध्यक्षपदी राजू कुटे, मानद सचिवपदी किशोर कोठावळे, कोषाध्यक्षपदी सुरेश माळोदे यांची निवड करण्यात आली.
पदाधिकाऱ्यांच्या निवडीची सूचना प्रकाश कदम यांनी तर अनुमोदन गोरख पाटील यांनी दिले. संस्थेचे तज्ज्ञ संचालक म्हणून  डॉ. योगेश कोशिरे, बबन घाटोळ, रामनाथ सहाणे, प्रशांत मारू, उदय कुवर, सुनील शिरसाठ, मुकेश पवार यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे संचालक संजय खैरे, प्रकाश कदम, जगदीश पाटोळे, शिवाजी चव्हाण आदींसह सभासद व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मावळते अध्यक्ष प्रकाश कदम यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वानी सहकार्य केल्याबद्दल सर्व संचालक मंडळाचे आभार मानले. सूत्रसंचालन राजू कुटे यांनी केले.

Story img Loader