मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील ३ लाख ११ हजार १११व्या (५० किलो) साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे मार्गदर्शक आमदार दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष एस. आर. देशमुख, नाथसिंह देशमुख, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, कारखान्याचे अध्यक्ष धनंजय देशमुख, उपाध्यक्ष जगदीश बावणे, कार्यकारी संचालक दत्ता िशदे आदी उपस्थित होते. ‘मांजरा’ने दरवर्षी उसाला सर्वाधिक भाव देऊन मराठवाडय़ात क्रांती केली. चालू हंगामदेखील यशस्वी करण्यास प्रयत्नशील आहे. कारखान्याने आतापर्यंत १ लाख ६४ हजार १९० मेट्रिक टन उसाचे गाळप केले. याही वर्षी मराठवाडय़ात सर्वाधिक भाव देईल, अशी ग्वाही कारखान्याच्या वतीने देण्यात आली.