दुष्काळग्रस्तांसाठी मांजरा व प्रियदर्शनी साखर कारखान्यांच्या वतीने मुख्यमंत्री निधीस ९२ लाख ९१ हजार ९४० रुपये दिले जात असल्याची माहिती आमदार दिलीपराव देशमुख यांनी मांजरा कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत दिली.
दुष्काळी स्थितीतीही मांजरा कारखान्याने साखरेच्या भावातील होणारे चढ-उतार अडचणीचे असले, तरी ऊसबिलापोटी सरकारने ठरवून दिल्यापेक्षा ५० रुपये जास्तीचा हप्ता शेतकऱ्यांना दिला. २२५० रुपये अग्रीम हप्ता देण्यात आला. सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक टनामागे १० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस दिले जात असल्याचे देशमुख यांनी सांगितले. पाण्याचे भीषण संकट सर्वासमोर आहे. यातून धडा घेऊन भविष्यात पाण्याचा काटेकोर वापर करून उसाची जोपासना आवश्यक असल्याचे मत आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केले. कारखान्याचे अध्यक्ष धनंजय देशमुख यांचेही भाषण झाले.
‘रेणा’ तर्फे ५१ लाख
वार्ताहर, लातूर
रेणा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ लाख व कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा १ दिवसाचा पगार संस्थापक अध्यक्ष आमदार दिलीपराव देशमुख यांच्याकडे कारखान्याचे अध्यक्ष यशवंत पाटील यांनी सुपूर्द केला. दुष्काळी स्थितीत कारखान्याने सर्वोच्च साखर उतारा मिळविल्याने दिलीपराव देशमुख यांनी कौतुक केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा