सुरक्षिततेचा उपाय म्हणून येथील रेल्वे स्थानकातील प्रवेशव्दाराजवळ प्रत्येक प्रवाशी बॅगांची तपासणी करण्यात येत असून रेल्वे पोलिसांच्या बॉम्बशोधक व श्वान पथकाकडून स्थानकाची तपासणी करण्यात आली आहे.
या रेल्वे स्थानकात हजारो प्रवाशांची वर्दळ असते. राज्यात कोणत्याही भागात काही विपरित घटना घडली तर या स्थानकावरील सुरक्षा वाढविली जाते.
तामीळनाडूतील चेन्नई रेल्वे स्थानकात झालेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर मनमाड स्थानकात रेल्वे पोलीस सतर्क झाले असून स्थानकातील सर्व तपासणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

Story img Loader