शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी व मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांना ‘रुईया रत्न’ (ज्वेल ऑफ रुईया २०१२) हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रुईया महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटनेतर्फे जोशी व देशमुख यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रत्येक क्षेत्रात काम करावयाचे तर तुमच्याकडे त्याविषयी आवड, जिद्द आणि मेहनत असायला हवी. मराठी माणसाने नोकरीच्या मागे न लागता उत्तम उद्योग व्यवसाय करावा, असा सल्ला मनोहर जोशी यांनी या वेळी दिला. तसेच पीएच. डी झालो. आता एक स्वप्न बाकी आहे व ते म्हणजे प्राध्यापक होण्याचे असेही त्यांनी नमूद केले. रुईया महाविद्यालयामुळे माझ्यावर व माझ्या संपूर्ण कुटुंबावर चांगले संस्कार झाले, असे मनोगत स्नेहलता देशमुख यांनी व्यक्त केले.