शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची चिखलमय मातीमुळे धोकादायक अवस्था झाली असून त्याचे प्रत्यंतर शुक्रवारी द्वारका परिसरातून टाकळीकडे जाणाऱ्या चौकात आले. उड्डाणपुलाच्या खालील रस्ता चिखलमय झाल्यामुळे अनेक दुचाकी वाहनधारकांचा कपाळमोक्ष झाला. अपघातात गंभीर स्वरुपाच्या दुखापती झालेल्या वाहनधारकांना रुग्णालयाचा रस्ता पकडावा लागला. महात्मा गांधी रोड, गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालयासमोरील परिसर या चिखलमय रस्त्यावर वाहनधारकांना अशीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात दुचाकी घसरून
टाकळीरोड परिसरात मोठी नागरी वस्ती आहे. स्थानिकांना जा-ये करण्यासाठी प्रामुख्याने याच मार्गाचा वापर करावा लागतो. उड्डाणपुलाखालील चौकातील रस्ता शुक्रवारी चिखलमय झाला. महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने माती सव्र्हीस रोडवर येणार नाही, याची दक्षता घेतली नाही. यामुळे रिमझिम पावसात रस्त्याचा हा भाग चिखलमय बनला. त्याची कल्पना नसलेल्या काही दुचाकी वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागले. चिखलमय रस्त्यावर अनेकांच्या दुचाकी घसरल्या. त्यात महिला, पुरूष व विद्यार्थी किरकोळ प्रमाणात जखमी झाले. ज्यांना अधिक दुखापत झाली त्यांना रुग्णालयात जावे लागले. रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे
संग्रहित लेख, दिनांक 29th Jun 2013 रोजी प्रकाशित
उड्डाणपुलाखालील रस्त्यावर घसरून अनेक वाहनधारक जखमी
शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची चिखलमय मातीमुळे धोकादायक अवस्था झाली असून त्याचे प्रत्यंतर शुक्रवारी द्वारका परिसरातून टाकळीकडे जाणाऱ्या चौकात आले. उड्डाणपुलाच्या खालील रस्ता चिखलमय झाल्यामुळे अनेक दुचाकी वाहनधारकांचा कपाळमोक्ष झाला.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 29-06-2013 at 12:49 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many driver injured after vehicle sleep under the flyover bridge in nashik