मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास समाजात समानता निर्माण होईल व सर्व जाती एकत्र जोडल्या जातील, असे प्रतिपादन मधुकर महाराज बारुळकर यांनी केले.
मराठा सेवासंघाच्या वर्धापनदिनानिमित्त येथील नटराज रंगमंदिरात मराठा संवर्धन मेळावा पार पडला. या वेळी बारुळकर महाराज बोलत होते. रविराज देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप मोरे, तर प्रमुख म्हणून कांतराव देशमुख, सुरेश गणेशकर, बाळासाहेब जामकर, स्वराजसिंह परिहार, मंचक जाधव यांची उपस्थिती होती. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या वेळी पुरस्कार देऊन, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. अनंतराव िशदे यांच्या जीवनचरित्रावरील ‘अनंत आरेखन’ या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन प्रवीण वायकोस, डॉ. वीणा भालेराव, यशवंत मकरंद यांनी केले. प्रकाश जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितीन देशमुख, रामेश्वर आवरगंड, गणेश सुरवसे, बालाजी मोहिते, महेश कोरडे, बाळासाहेब यादव, दयानंद जाधव, पवन पारवे, अतीश गरड, रामदास अवचार, बालाजी िशदे आदींनी परिश्रम घेतले.

Story img Loader