लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येकच राजकीय पक्षाने रूपेरी पडद्यावरील काही ताऱ्यांना उमेदवारी दिली आहे. बॉलिवूडच्या गुल पनाग किरण खेर यांच्याबरोबरच बंगाली अभिनेता देव याला तृणमुल काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. मराठीत महेश मांजरेकर (मनसे) मुंबईतून ‘निवडणुकीची परीक्षा’ देतो आहे तर नंदू माधव आणि दीपाली सय्यद हे ‘आप’च्या तिकिटावर अनुक्रमे बीड आणि अहमदनगरमधून निवडणुकीच्या रंगमंचावर उतरले आहेत.निवडणुकीच्या आखाडय़ात कोणत्या ताऱ्याचा किंवा तारकेचा अभिनय अधिक प्रभावी ठरतो, या मंडळींसाठी बॉलिवूडमधील किती सेलिब्रेटी थेट प्रचारात उतरतात आणि बॉलिवूडचे हे ‘स्टार’ लोकसभा निवडणुकीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणार की अनुत्तीर्ण, याकडे बॉलिवूडबरोबरच सर्वसामान्य मतदारांचेही लक्ष लागले आहे.

Story img Loader