शहरातील गंगापूर रस्त्यावरील शंकरनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात ‘मिस् मॅच’ या मराठी चित्रपटातील कलाकारांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन केले.
श्री साईबाबा मंदीर ट्रस्ट येथे अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री मृण्मयी कोलवालकर, दिग्दशक अलोक श्रीवास्तव व इतर कलाकारांनी उपस्थिती लावली. मंदिराचे अध्यक्ष भुवनेश कडलग यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थितांशी कलाकारांनी संवाद साधला.
उपस्थितांनी चित्रपटाविषयी काही प्रश्न विचारले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना भूषण प्रधान यांनी आपल्याला ज्या क्षेत्रात कारकीर्द करायची ते क्षेत्र प्रथम निश्चित करण्याचा सल्ला दिला.
शिक्षण पूर्ण करून मगच चित्रपट क्षेत्रात येण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी अरूण काळे, सुधाकर पुंडे, बाळासाहेब धामणे, निलिमा शिंदे, माणिक गायकर, शारदा फुटे आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा