मराठी चित्रपटांचे बजेट हे काही कोटींमध्ये नसले तरी हे चित्रपट गुणवत्तेच्या तुलनेत इतर चित्रपटांपेक्षा अग्रेसर आहेत, असे उद्गार दिग्दर्शक रवि जाधव यांनी येथे काढले. मराठी भाषादिनानिमित्त सहयोग मंदिर सभागृहात आयोजित परिसंवादात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परममित्र प्रकाशन संस्थेचे प्रकाशक माधव जोशी या चर्चासत्रात सहभागी झाले होते. अर्थतज्ज्ञ आणि कालनिर्णय उद्योग समूहाचे प्रमुख संचालक जयराज साळगांवकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

Story img Loader