ज्येष्ठ नाटय़समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांनी संपादित केलेल्या ‘मराठी नाटय़कोश’ या ग्रंथाची प्रत शनिवारी बारामती येथे नाटय़संमेलनाच्या निमित्ताने केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना देण्यात आली. ‘अमेय इन्सपायरिंग बुक्स’चे उल्हास लाटकर या वेळी उपस्थित होते.
या ग्रंथात मराठी नाटके, अभिनेते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, समीक्षक यांच्याविषयीच्या माहितीचा समावेश आहे. मराठीबरोबरच इतर भारतीय भाषांमधील रंगभूमीचा संक्षिप्त इतिहासही या कोषात आहे. इतर राज्यातील रंगकर्मीनाही मराठी रंगभूमीची माहिती व्हावी यासाठी या कोषाचा हिंदी अनुवाद प्रकाशित करण्यात आला आहे.
पुण्यातील कलाकार शैलेश ढेरे आणि बारामतीतील ‘प्रणव डेव्हलपर्स’चे संचालक भारत भोसले यांची निर्मिती असलेल्या दिनदर्शिकेचेही या निमित्ताने पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मराठी नाटय़सृष्टीत आपल्या प्रतिभेचे मोलाचे योगदान देणाऱ्या नामवंत कलाकारांच्या कलाकृतींची झलक या दिनदर्शिकेत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा