महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने आयोजित ५३ व्या राज्यस्तरीय नाटय़ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ‘भाई, तुम्ही कुठे आहात?’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. हे नाटक अंतिम फेरीत दाखल झाले आहे. प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी हे नाटक लिहिले असून रमाकांत भालेराव यांचे दिग्दर्शन आहे.
खटकेबाज संवादाच्या या नाटकास बीड येथील स्पर्धेत भरभरून प्रतिसाद मिळाला. दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक रमाकांत भालेराव यांना मिळाले. पुरुष गटात अभिनयाचे पारितोषिक नितीन धोंगडे यांना मिळाले. त्यांनी मिलिंदचे पात्र साकारले. अमृता तोडरमल यांना मंजुळा या व्यक्तिरेखेसाठी अभिनयाचा प्रथम पुरस्कार मिळाला. किशोर शिरसाठ यासही भास्करराव या भूमिकेसाठी गौरविण्यात आले. या नाटकाच्या प्रकाशयोजनेसाठीचे प्रथम पारितोषिक प्रसाद वाघमारे यांना, तर नेपथ्यसाठी वैभव बेलसरे, प्रेमानंद लोंढे, संगीतासाठी रोहित देशमुख यांनाही पारितोषिके मिळाली. ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. दिलीप घारे यांचे या नाटकास मार्गदर्शन लाभले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा