मराठी भावसंगीताच्या समृद्ध परंपरेतील गेल्या पिढीतील एक प्रमुख शिलेदार पं.हृदयनाथ मंगेशकर आणि नव्या पिढीत तोच वारसा समर्थपणे जपणारे सलील कुलकर्णी या दोन मातब्बरांचा सहभाग असणारी ‘मैत्र जिवांचे..’ ही मैफल शुक्रवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटीतर्फे बदलापूरजवळील आदिवासी पाडय़ांमध्ये निरनिराळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. या कार्यक्रमातून जमा होणारा निधी त्यासाठी वापरला जाणार आहे. दोन महिन्यांपूर्वी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात भावसंगीताची ही मैफल झाली. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये किमान एकदा हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आयोजक समीर जोशी आणि प्रशांत नाईक यांनी सांगितले. ज्ञानेश्वरांच्या विराण्या, ग्रेस, आरती प्रभू, सुरेश भट ते आताच्या पिढीतील किशोर कदम, संदीप खरे यांच्या रचना या मैफलीत ऐकता येतील.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा