लोकशाहीर व संगीतकार शांताराम चव्हाण यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘गावरान पाखरू’ या नव्या अल्बमचे नुकतेच प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला मधुकर नेराळे, माया जाधव, देवदत्त साबळे, वामन केंद्रे, प्रकाश खांडगे, मीनल जोगळेकर, ‘युनिव्हर्सल’चे राजन प्रभू, वैशाली सामंत, उत्तरा केळकर, संगीतकार अशोक पत्की आदी मान्यवर उपस्थित होते.
या अल्बममध्ये एकूण १० लावण्या असून त्या शांताराम चव्हाण, अर्चना गोरे, मैथिली जोशी, उत्तरा केळकर आदी गायकांनी गायल्या आहेत. आकाशवाणीवर चार दशके कार्यक्रम सादर करणाऱ्या व हार्मोनियम, खंजिरी, अॅकॉर्डियन, संतूर आदी वाद्यांमध्ये पारंगत असणारे लोकशाहीर चव्हाण यांनी या लावण्यांना स्वरसाज चढवताना आजच्या तरुणाईच्या पसंतीचा विचार केला आहे. जुन्या-जाणत्या रसिकांसह सध्याच्या पिढीलाही या लावण्या आवडतील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
‘श्यामचे वडील.. एक नवे पर्व’च्या अल्बमचे प्रकाशन
ही गाणी हरिहरन, सोहम पाठक आदींनी गायली असून आर. विराज दिग्दर्शित या चित्रपटात तुषार दळवी, रिमा, सुलेखा तळवलकर, चिन्मय उदगीरकर, विनय आपटे, डॉ. मोहन आगाशे, विद्याधर जोशी आदी कलाकार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2012 रोजी प्रकाशित
‘गावरान पाखरू’मध्ये लावण्यांचा नजराणा
लोकशाहीर व संगीतकार शांताराम चव्हाण यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘गावरान पाखरू’ या नव्या अल्बमचे नुकतेच प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात प्रकाशन करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 25-11-2012 at 12:09 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi new lavani album of musician shantaram chavan