तब्बल पन्नास वर्षे मुंबईसह साऱ्या महाराष्ट्राच्या मराठी माणसातील स्वाभिमान जागवणारे व त्याला ताठ मानेने जगण्याची प्रेरणा देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने विदर्भातील शिवसैनिकांसह अवघी मराठी मने हादरली असून आपला आधारवड गमावल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.  
माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे- महाराष्ट्रावर अतीव प्रेम करणारा सुसंस्कृत, खंबीर व लढवय्या नेता हरपल्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बाळासाहेब अतिशय संघर्षांच्या काळात जीवन जगले आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी शिवसेनेची स्थापना केली. मुंबईतच नाही, तर अख्या देशात त्यांनी मराठी माणसाला नाव, आत्मसन्मान मिळवून देत त्यांच्यामध्ये जगण्यासाठीचा विश्वास जागविला. पत्रकार व व्यंगचित्रकार म्हणूनही त्यांचे कार्य अतिशय मोठे आहे. सगळय़ांवर सर्वार्थाने प्रेम करणाऱ्या अशा नेत्याच्या निधनाने राज्यात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मनोहर सप्रे– व्यंग चित्रकार, राजकारणी आणि व्यक्ती म्हणून बाळासाहेब ठाकरे अतिशय दिलखुलास व्यक्तीमत्व होते. मार्मिक सुरू केल्यानंतर अगदी सुरुवातीच्या काळापासून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. तो अनुभव वेगळाच होता. त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये टीका करण्याची एक वेगळी शक्ती होती. तेव्हाच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून जोरदार टीका केली. व्यंगचित्रकार म्हणून एक मोठा कलावंत असण्यासोबत राजकारणातही त्यांचे स्थान पहिल्या क्रमांकाचे होते. एका व्यंगचित्रकाराने राजकारणात एवढी मोठी झेप घेतल्याचे भारतातील हे पहिलेच उदाहरण आहे.  परंतु राजकारणात सक्रीय झाल्यानंतर त्यांनी व्यंगचित्र काढणे बंद केले. तरी त्यांच्या सराईत टीकात्मक राजकीय भाषणातून व्यंगचित्र शेवटपर्यंत जिवंत होते.
विधानसभा उपाध्यक्ष प्रा.वसंत पुरके- जातपात-धर्म-पंथ यापलिकडे जाऊन सर्वसामान्य माणसातून नेतृत्व उभे करणारे आणि उपेक्षितांना सुध्दा प्राधान्याने न्याय देण्यासाठी त्यांना सत्तेत संधी देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करुन माणसे घडविण्याचे कार्य केले, त्याचा विसर महाराष्ट्राच्या जनतेला कधीच पडणार नाही. शब्दांनी जग पेटविण्याचे विलक्षण सामथ्र्य त्यांच्या व्यक्तिमत्वात होते. त्यांच्या िहदुत्वाच्या कट्टर भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना िहदुह्रदयसम्राट अशी पदवी दिली होती. त्यांच्या निधनाने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे- शिवसेनेचे सुप्रिमो बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्रातील एक अविरत चालणार वादळ होते. त्यांच्या शब्दात एवढी प्रचंड ताकद होती की, त्यांच्या एका शब्दावर प्राणार्पण करण्याची तयारी ठेवणारे अगणित शिवसनिक त्यांनी निर्माण केले होते. इतिहासात अशा प्रकारचे व्यक्तिमत्व क्वचितच निर्माण होत असते. त्यांच्यासारखा निर्भय माणूस सारे राज्य निर्भय व्हावे यासाठी झटत राहिला. विरोधकांवर टीकेची तोफ डागतांना ते कोणाचीही गय करीत नव्हते. आज एक वादळ शमले आहे.
अन्न व प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाईक घराण्याशी अतिशय कौटुंबिक स्वरूपाचे संबंध होते. माझे काका दिवगंत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यापासून तर माझे वडीलबंधु दिवगंत मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्याशी बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय घरोब्याचे आणि मत्रीचे संबंध होते. या दोन कुटुंबात राजकीय मतभेद जरुर होते, पण त्याला मनभेदांचे स्वरूप कधी आले नाही. त्यांच्या निधनाने नाईक कुटूंबाने आपल्याच कुटूंबातील एक माणूस गमावला.
सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे- िहदुत्व हा शिवसेना सुप्रिमो बाळासाहेब ठाकरे यांचा श्वास होता. ती त्यांची जीवन प्रणाली होती. धर्म, जात आणि पंथाच्या पलिकडे पाहण्याची त्यांची दूरदृष्टी असल्यामुळेचं शिवसेनेत सर्व प्रकारच्या लोकांना कुठल्याही भेदभावाशिवाय मोठ-मोठाली पदे त्यांनी दिली. या गुणांमुळेच सर्वसामान्य माणूस त्यांच्याकडे श्रध्देने पाहत होता. त्यांच्या निधनाने एका संघर्षमय वादळी जीवनाचा अंत झाला. महाराष्ट्राने ४० वर्ष एक ठाकरे युग अनुभवले.
आमदार अशोक शिंदे- संघटनेचा आधारवड गेला. गेल्या २५ वर्षांंपासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. त्यापैकी पहिली १६ वर्षे थेट बाळासाहेबांचा आदेश माझ्यासाठी शिरसावंद्य होता. उध्दवजींच्या नेतृत्वाखाली काम करतांनाही बाळासाहेब हेच दैवत होते. त्यांना भेटलो की, देवदर्शनाप्रमाणे नवी ऊर्जा मिळायची. आता तो ऊर्जास्त्रोतच संपल्यासारखे वाटते.
आमदार प्रा. सुरेश देशमुख- महाविद्यालयीन जीवनापासून बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे आकर्षण होते. त्यांच्या वध्र्यात झालेल्या काही भाषणांनी प्रभावितही झालो. एका झंझावाताप्रमाणे त्यांची उपस्थिती असायची. त्यांचे निधन महाराष्ट्राचे मोठे नुकसान करणारे ठरले आहे.
जिल्हा प्रमुख रविकांत बालपांडे- अगदी पोरके झाल्यासारखे वाटते. बाळासाहेबांची वध्र्यात सभा झाली तेव्हा हजर होतो. वयाने लहान असलो तरी नेत्यांची भाषणे ऐकायचो. बाळासाहेबांचे भाषण ऐकले अन् शिवसैनिक झालो. तीन दिवसांपासून मुंबईतच आहे, पण व्यापारी व अन्य संघटनांनी उद्या रविवारला स्वयंस्फु र्त वर्धा बंद ठेवण्याची भूमिका कळविली. शांततेत बंद व्हावा, असे माझे आवाहन आहे.
शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने संपूर्ण जगातील हिंदूमनावर राज्य करणारे निधडय़ा छातीचे नेतृत्व हरवले आहे. तमाम शिवसैनिकांचा श्वासच जणू हरवला आहे. त्यांच्या निधनाने झालेले नुकसान भरून निघणार नाही. एका प्रेरणादायी युगाचा अंत झाला आहे.
माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख- बाळासाहेबांच्या निधनाने महाराष्ट्राचा राजकीय चेहरा हरपला आहे. शिवसेना तळागाळात पोहोचवण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. त्यांची विचारधारा कुणाला आवडो अथवा न आवडो त्यांनी कायम महाराष्ट्रमनावर राज्य केले. एक उत्तुंग आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे.
आमदार डॉ. अनिल बोंडे- भुतो न भविष्यते असे एक व्यक्तिमत्व बाळासाहेबांच्या रूपाने महाराष्ट्राने अनुभवले आहे. त्यांचे कार्य दैवी स्वरूपाचे आहे. जनसामान्यांना त्यांचा कायम आधार वाटत आला. ते आपल्या गुरुस्थानी होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण राष्ट्र दु:खी झाले आहे.  
आमदार बच्चू कडू- एका सामान्य कार्यकर्त्यांला नेता बनवणारा आणि थेट मुख्यमंत्रीपद बहाल करणारा असामान्य माणूस आपल्यातून निघून गेला आहे. त्यांनी राजकारणात अनेक आदर्श घालून दिले. त्यांच्या निधनाने एक आदर्शच नाहीसा झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे प्रभावी व्यक्तिमत्व आपल्यात नसणे हे दु:खदायी आहे.  
खासदार भावना गवळी- िहदूह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने शिवसनिकांचे आधारस्तंभ, छत्रच हरविले आहे. ही हानी महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण िहदुस्थानाची हानी झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तीमत्व आमच्यातून निघून गेले. ही हानी कधीही भरून निघणारी नाही, परंतु त्यांनी जे आमच्यासाठी केले ते आम्ही आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी आमचे शब्दही अपुरे पडतील.
माजी खासदार अनंतराव देशमुख- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे निधडय़ा छातीचा, कुणालाही न भिणारा असा महाराष्ट्राचा एक नेता आपल्यातून निघून गेल्यामुळे महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. बाळासाहेबांनी महाराष्ट्रात व प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसाला न्याय देण्यासाठी वेळेप्रसंगी कठोर भूमिका घेतल्या.  
शिवसेना खा. प्रतापराव जाधव- हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचा प्राण होते. त्यांच्या निधनाने शिवसैनिकांचा प्राण गेला आहे. हे दु:ख पचविणे अतिशय कठीण आहे. शिवसेना प्रमुख असामान्य व्यक्तिमत्व होते. त्यांनी आमच्यासारख्या सामान्य माणसाला मोठे केले.  यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, आमचा देव हरविला आहे. आम्ही आयुष्यात बाळासाहेबांच्या रूपानेच जिवंत देव पाहिला व या देवाची प्राणपणाने पुजा केली.
शिवसेना आ. विजयराज शिंदे- जीवन समृध्द करणारा व ऊर्जा देणारा आमचा ह्रदयसम्राट तेजस्वी सूर्य मावळला आहे. हे दु:ख पचविणे कठीण व अशक्य आहे.  
ज्येष्ठ काँग्रेस नेते बाबासाहेब धाबेकर- मराठी मनाला चटका लावून टाकणारी ही घटना आहे. एक दिलदार माणूस म्हणून त्यांचा सर्वत्र परिचय होता. बाळासाहेबांच्या निधनाने एक थोर मराठी नेता आमच्यात नसल्याची खंत वाटते. युती शासनाच्या काळात आमचा त्यांच्याशी घरोबा होता.

Story img Loader