मराठी भाषेचा अभिमान सर्वानी बाळगला पाहिजे आणि मराठीतच बोलायला पाहिजे. हा मराठी भाषेच्या अस्मितेचा प्रश्न आहे त्यासाठी महाराष्ट्राचे मराठीकरण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ संस्कृत तज्ज्ञ डॉ. ग. उ. थिटे यांनी नुकतेच मुंबईत केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडय़ाच्या निमित्ताने मराठी भाषा विभागाअंतर्गत भाषा संचालनालयाने आयोजित केलेल्या ‘परिभाषेची निर्मिती’ या विषयावर डॉ. थिटे बोलत होते.
पारिभाषिक शब्दांची निर्मिती किंवा अन्य कोणतेही कोश तयार केल्यानंतर त्यातील शब्द योग्य की अयोग्य आहेत, हे काळाच्या ओघात तपासणे महत्वाचे आहे. कोणताही पारिभाषिक शब्द हा अवघड नसतो. तो परिचित नसल्याने अवघड वाटतो, असेही डॉ. थिटे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाषा संचालनालयाच्या अधिक्षक मनस्विता सोनावणे यांनी केले. सहाय्यक भाषा संचालक प्रधान यांनी डॉ. थिटे यांचा परिचय करून दिला.
‘स्मार्ट फोन डम्ब पीपल’ पुस्तकाचे प्रकाशन
ऑक्सफर्ड स्टोअर्स आणि गुड टाइम्स बुक प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका कार्यक्रमात  पार्थजित सरमा लिखित ‘स्मार्ट फोन डम्ब पीपल’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. या कार्यक्रमास वास्तुविशारद सुधीर दिवाण, प्रा. यशवंत पीटकर हे उपस्थित होते. सध्याच्या काळातील मानवी जीवनातील प्रत्येक क्षण आपण आधुनिक तंत्रज्ञानावरच कसे अवलंबून आहोत, याचे विश्लेषण सरमा यांनी या पुस्तकात केले आहे.

Story img Loader