मराठी विकिपीडिया अधिकधिक समृद्ध होण्याच्या दृष्टीने यामध्ये लोकसहभाग वाढावा यासाठी दरवर्षी मराठी भाषा दिनाच्यानिमित्त फोटोथॉनचे आयोजन करण्यात येते. यामध्ये यावर्षी तब्बल ५४०० फोटो जमा झाले असून ते लवकरच विकिपीडियाच्या संग्रहात समाविष्ट होतील.
विकिपीडिया या मुक्त विश्वकोशात लोकांचा सहभाग होऊन ताज्या घडमोडी आणि अधिकाधिक स्थळे, वस्तू, पक्षी, प्राणी, फुले आदींची माहिती छायाचित्रांसह उपलब्ध व्हावी यासाठी या फोटोथॉनचे आयोजन २७ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत करण्यात आले होते. या कालावधीत यंदा ५४०० फोटो साइटवर अपलोड झाले आहेत. सन २०१२ पासून फोटोथॉनचे आयोजन केले जात आहे. दरवर्षी याला प्रतिसाद वाढत असल्याचे मराठी विकिपीडियाचे प्रचालक राहुल देशमुख यांनी स्पष्ट केले. मराठी विकिपीडियातील माहिती अधिक आकर्षक आणि समृद्ध करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो, असे ते म्हणाले. मराठी विकिपीडियावर सध्या उपलब्ध असलेल्या चित्रांपैकी बहुतांश चित्र, नकाशे, व्यक्तींचे छायाचित्रे, सांस्कृतिक वारसा, इमारतींची माहिती ही वाचकांच्या योगदानातूनच उपलब्ध झाली आहे. यंदा प्राप्त झालेल्या छायाचित्रांमध्ये काही दुर्मिळ पक्षी, विंटेज गाडय़ा, दुर्मिळ झाडे अशा छायाचित्रांचा समावेश असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
मराठी विकिपीडियामध्ये ५४०० नव्या छायाचित्रांचा समावेश
मराठी विकिपीडिया अधिकधिक समृद्ध होण्याच्या दृष्टीने यामध्ये लोकसहभाग वाढावा यासाठी दरवर्षी मराठी भाषा दिनाच्यानिमित्त फोटोथॉनचे आयोजन करण्यात येते.
आणखी वाचा
First published on: 12-03-2014 at 06:54 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi wikipedia includes 5400 new photos