भगवान शंकराने त्या काळात विष पचवले होते. शिविलग शिवाचार्य महाराजांच्या तपोनुष्ठानातून समाजाला दुष्काळाचे हलाहल पचवण्याची शक्ती मिळो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
डॉ. शिविलग शिवाचार्य महाराज यांच्या ७९व्या श्रावणमास तपोनुष्ठानाच्या सांगता समारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, स्वातंत्र्यपूर्वकाळात देश, समाज समृद्ध व्हावा यासाठी तपोनुष्ठान करण्याची प्रथा होती. शतायुषी असणाऱ्या शिविलग शिवाचार्य महाराज यांनी हीच परंपरा कायम ठेवून तपोनुष्ठान केले आहे. एक व्यक्ती एवढे मोठे कार्य करत स्वत:बरोबरच लाखो अनुयायांना सन्मार्गाला लावतो, हे अद्भुत कार्य होय. महात्मा बसवेश्वरांनी जेव्हा धर्माचे स्वरूप कर्मकांडात व त्याची मालकी मूठभर लोकांकडे होती, व्यक्तिभेद, िलगभेद होता तेव्हा समतायुक्त समाज निर्माण करण्याचे मोठे काम केले. तीच परंपरा डॉ. शिविलग शिवाचार्य महाराज यांनी पुढे सुरू ठेवली आहे. वीरशैव समाजाचा मोठा पंथ असून या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे. संजीवनी बेटावर अनेक औषधी वनस्पती आहेत. त्याचा उपयोग आगामी काळात करण्यासाठी जे प्रकल्प हाती घेतले जातील त्याला महाराष्ट्र शासनाचा पूर्ण पािठबा असेल व या परिसरातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील असे आश्वासनही त्यांनी दिले. िलगायत समाजाच्या मागण्यांसाठी मंत्रिमंडळातील विजय देशमुख या मंत्र्यांची समिती तयार करण्यात आली असून त्याचा अहवाल प्राप्त होताच निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले.
प्रारंभी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. खासदार सुनील गायकवाड यांचे समयोचित भाषण झाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिविलग शिवाचार्य लिखित ‘परमरहस्य’ या ग्रंथाचे व महाराजांच्या जीवनावरील आधारीत सिडीचे प्रकाशनही करण्यात आले. व्यासपीठावर खासदार सुनील गायकवाड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, सुधाकर भालेराव, विनायक पाटील, माजी आमदार गोिवद केंद्रे, गणेश हाके, नागनाथ निडवदे, अॅड. अण्णाराव पाटील, रामचंद्र तिरुके, पांडुरंग पोले, दिनकर जगदाळे, प्रतिभा पाटील कव्हेकर, आदी उपस्थित होते.
दुष्काळाचे हलाहल पचवण्याची शक्ती समाजाला मिळो : मुख्यमंत्री
समाजाला दुष्काळाचे हलाहल पचवण्याची शक्ती मिळो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
Written by दया ठोंबरे

First published on: 07-09-2015 at 01:56 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taponushathan closing ceremony