देसरडा उद्योगसमूह प्रायोजित व खडकी स्पोर्ट्स असोसिएशनद्वारा आयोजित मराठवाडा कनिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धेत रमशा फारुकीने तिहेरी मुकूट प्राप्त केला. १०, १३ आणि १५ वर्षांखालील मुले-मुलींच्या एकेरी व दुहेरी गटात स्पर्धा झाल्या.
अंतिम सामन्यातील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्याचा कार्यक्रम पोलीस उपायुक्त डॉ. सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर, माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष विरेन पाटील, सचिव सिद्धार्थ पाटील, नांदेड बॅडमिंटन असोसिएशनचे महेश वाकरडकर व देसरडा उद्योगसमूहाच्या सुनीता देसरडा उपस्थित होत्या.
अंतिम सामन्यातील विजेते : १० वर्षांखालील मुली – साक्षी जोशी, मुले – प्रथमेश कुलकर्णी; १३ वर्षांखालील मुली – रमशा फारुकी, मुले – रुद्र अभ्यंकर, दुहेरी : अमन राठोड-हर्षद राठोड; १५ वर्षांखालील मुली – रमशा फारुकी, मुले – केतन पाटणी, दुहेरी – सिद्धेश देशमुख-दर्शन भालेराव.
स्पर्धेत पंच म्हणून अ‍ॅड. अभिजीत फुले, टंकसाळी, अतुल कुलकर्णी, प्रभू रापतवार, हिमांशू गोडबोले, चैतन्य तळेगावकर, सचिन कुलकर्णी, भूषण गोडबोले, मित कौशल, तुषार पाटील यांनी काम पाहिले. पारितोषिक समारंभास खडकी स्पोर्ट्स असोसिएशनचे अजित बापट, दिनकर तेलंग व सचिव नितीन इंगोले उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा