ठाणे येथील मराठवाडा जनविकास परिषदेच्या वतीने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन येत्या १७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उस्मानाबादचे खासदार प्रा.रवी गायकवाड, सिने कलाकार मंगेश देसाई आणि कोकण विभागाचे आयुक्त राधेश्याम मोपलवार हे उपस्थित राहणार आहेत. मूळ मराठवाडय़ातील पण आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात राहणाऱ्या व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या नामवंतांचा गौरव यावेळी केला जाणार असून याच कार्यक्रमात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ८० टक्के वा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ( मूळचे राहणारे मराठवाडय़ातील) मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला जाईल. विद्यार्थ्यांनी यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. हा कार्यक्रम ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय सभागृह, जिल्हा परिषद कार्यालयासमोर,  स्टेशन रोड, ठाणे (प.) येथे सायंकाळी ६.१५ वाजता होईल. अधिक माहितीसाठी संपर्क – डॉ. अविनाश भागवत –  dr.avinashbhagwat@gmail.com

Story img Loader