मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदस्यातील फाटाफुटीमुळे १५ वर्षांपूर्वी सुंदरराव सोळंके यांच्याकडून गेलेले संस्थेचे नेतृत्व सोळंके यांचे चिरंजीव आ. प्रकाश सोळंके यांनी अजित पवार यांच्या संमतीने संस्थेच्या सभासदांची मोट बांधून आपल्याकडे खेचून आणले. विभागात शैक्षणिक आणि राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचे असलेल्या या शिक्षण संस्थेच्या नव्या कार्यकारिणीत सोळंके यांच्यासह आ. अमरसिंह पंडित व  सात सदस्य जिल्हय़ातील आहेत. यामुळे या संस्थेवर जिल्हय़ातील नेत्यांचे वर्चस्व वाढले आहे.
    बीड जिल्हय़ातील माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके स्थापनेपासून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात सक्रिय होते. माजी मंत्री विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थेत काम करताना १५ वर्षांपूर्वी संस्थेचे नेतृत्व सोळंके यांच्याकडे होते. याच काळात सोळंके यांनी जिल्हय़ात विशेष लक्ष घालून बलभीम व विधी महाविद्यालय, माजलगांवमध्ये वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय, गेवराई, अंबाजोगाई, धारूर या ठिकाणी महाविद्यालये स्थापन केली. तर ग्रामीण भागातही सादोळा, गंगामसला, सिरसाळा, हिवरा (गो.), कारी, परळी या ठिकाणी माध्यमिक विद्यालये स्थापन केली. मात्र संस्थेअंतर्गत सदस्यांची फाटाफूट झाल्यानंतर जिल्हय़ातील माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्यासह अनेकांनी मधुकरराव मुळे यांना साथ दिल्यामुळे संस्थेचे नेतृत्व त्यांच्याकडे गेले. काही दिवसांपूर्वी मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षपद आ. सोळंके यांच्याकडे द्यावे, यासाठी जिल्हय़ातील नेत्यांनी मोच्रेबांधणी केली. आ. अमरसिंह पंडित, नूतन राज्यमंत्री सुरेश धस, माजी आ. धनंजय मुंडे यांनी सभासदांची जमवाजमव करून मधुकर मुळे यांना सरचिटणीसपदावरून हटवण्यात यश मिळवले. संस्थेच्या २१ सदस्यांच्या नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष प्रकाश सोळंके यांच्यासह सहचिटणीस म्हणून आ. अमरसिंह पंडित तर कार्यकारिणी सदस्य म्हणून माजी आ. बाबुराव आडसकर यांचे चिरंजीव मेघराज आडसकर, माजी खा. रामराव आवरगांवकर यांचे चिरंजीव अभिजीत आवरगांवकर, माजलगांव तालुक्यातील मिच्छद्र देशमुख (एम.टी.नाना), भारत साळुंके, नरहरी निर्मळ यांचा समावेश आहे. यामुळे या संस्थेच्या कार्यकारी मंडळावर जिल्हय़ातील नेत्यांचे वर्चस्व वाढले आहे.

During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
loksatta readers feedback
पडसाद : मनात डोकावून पाहायला लावणारे भाषण
author samantha harvey wins the booker prize 2024 with orbital novel
समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार
sharad pawar nagpur, Sharad Pawar visits Nagpur,
पवार यांचा नागपूर दौरा, भाजपला इशारा अन् कॉंग्रेस नेत्यांशी खलबते