दलित महिलेची जमीन बळकावल्याचा आरोप करीत गंगाखेड शुगर्सचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांना अटक करावी, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गंगाखेड येथे सोमवारी (दि. २८) मोर्चाचे आयोजन केले आहे.
भाकपने याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. अॅड. मनोहर टाकसाळ व राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघेल. गंगाखेड शुगर्स या कारखान्याने खासगीकरणाच्या तत्त्वावर नव्हे, तर गुंडगिरीवर कारखाना चालविला. दलित महिलेची जमीन बळकावल्याबद्दल रीतसर गुन्हा दाखल झाला. कारखान्याच्या डिस्टिलरीतून स्पेन्ट वॉश व अन्य घातक रसायनांमुळे मन्नाथ तलाव व बनिपपळा परिसर प्रदूषित करून मच्छीमारांसह नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण केला आहे, असा आरोप पत्रकात आहे. ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे वजन काटा मारून, बेकायदा अनामत रकमा कपात करून नुकसान व पिळवणूक होत असल्याचा आरोपही पत्रकात केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा