औरंगाबाद जिल्ह्य़ातील विविध कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या संघटित व असंघटित कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ‘सीटू’तर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वे स्टेशन, चितेगाव, पैठण परिसरातील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या संघटित व कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. दुपारी १२ वाजता सीटूतर्फे उद्धव भवलकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चा क्रांती चौक, पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, शहागंजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्यांची तड महिन्यात न लागल्यास कामगारांचे मोठे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा