अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा इचलकरंजीत निषेध नोंदविण्यात आला. शोकफेरीचे आयोजन करण्यात आल्यानंतर पुरोगामी व अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, यावेळी गुरुवारी सायंकाळी ४ वाजता नगरपालिकेच्या सभागृहात सर्वपक्षीय व संघटनांची श्रद्धांजली सभा आयोजित केली आहे.
डॉ. दाभोळकर यांची हत्या झाल्याचे वृत्त कळताच अंनिसचे कार्यकत्रे संघटनेच्या राजाराम मदानातील कार्यालयाजवळ जमू लागले. त्यांच्यातून या हत्येविषयी चिड व्यक्त केली जात होती. यानंतर सर्व कार्यकत्रे सत्यनारायण मंगल कार्यालयात जमले. तेथे अंनिसचे कार्याध्यक्ष सुनील स्वामी, कॉ. दत्ता माने, शाहीर विजय जगताप यांची भाषणे झाली. तेथून शोकफेरीला सुरुवात झाली. डॉ. आंबेडकर पुतळा, छ. शिवाजी पुतळा माग्रे फेरी महात्मा गांधी पुतळ्याजवळ आली. तेथे डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर, नगरसेवक भीमराव अतिग्रे, अंनिसचे ज्येष्ठ कार्यकत्रे टी. आर. िशदे, शामराव नकाते, अजित मिणेकर आदी उपस्थित होते. डॉ. दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सुनील स्वामी म्हणाले, ही घटना अत्यंत दुखदायक व िनदनीय आहे. व्यक्ती संपवून विचार संपत नसतात. अंनिसचा प्रत्येक कार्यकर्ता डॉ. दाभोळकर यांचे विचार पुढे नेण्यास तत्पर आहे. त्यांनी संयमीपणे आपल्या विचारांची मांडणी केली होती. प्रतिगामी शक्तींकडून त्यांना जादूटोणा कायदा होऊ नये यासाठी धमक्या येत होत्या. या प्रवृत्तीचा शासनाने छडा लावला पाहिजे. डॉ. दाभोलकर यांना शासनाने श्रद्धांजली वाहायची असेल तर त्यांच्या विचारातून पुढे आला जादूटोणा विरोधी कायदा विधिमंडळता संमत केला पाहिजे. डॉ. दाभोळकरांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळीसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाने कायदा मंजूर केल्यास या चळवळीला काही प्रमाणात दिलासा मिळेल.
 

Story img Loader