अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी लातुरात शैक्षणिक बंद पाळण्यात आला. शाहू चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
दाभोलकर यांच्या हत्येचा तपास केंद्र सरकारच्या विशेष पथकाकडून करावा, जादूटोणाविरोधी कायदा हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. मोर्चात विविध सामाजिक संघटना, सेवाभावी स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, जिल्हा मुक्टा प्राध्यापक संघटना, मागासवर्गीय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघ आदींचा सहभाग होता. डॉ. गोपाळराव पाटील, अॅड. मनोहर गोमारे, प्राचार्य अनिरुद्ध जाधव, माधव बावगे, अॅड. उदय गवारे, बाबा हलकुडे, स्वातंत्र्यसनिक मुर्गाप्पा खुमसे, प्रदीप पाटील खंडापूरकर, मोहन माने, सुभाष िभगे, ओमप्रकाश आर्य, आदींसह नागरिक, विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

Story img Loader