रिक्षा व्यावसायिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या, गुरुवार, १४ फेब्रुवारीला महाराष्ट्रभर प्रादेशिक परिवहन कार्यालयावर रिक्षा व्यावसायिक मोर्चा काढणार आहेत, अशी माहिती रिक्षाचालक संघटनेच्या वतीने बाबा इंदूलकर यांनी येथे दिली. या मागण्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती रद्द करा, परमिट नूतनीकरण सुरू करा, इन्शुरन्स फी कमी करा, नवीन रिक्षा परवान्याचे वाटप करा, रिक्षाचालकांना निवृत्तिवेतन व प्रा. फंड द्या, स्वस्त दरात घरे उपलब्ध करून द्या, अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत. उद्या गुरुवार, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सासने ग्राऊंड येथे जमून रिक्षासहीत मोर्चाने परिवहन कार्यालयावर जाऊन या मागण्यांचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात येणार आहे. तरी सर्व रिक्षा व्यावसायिकांनी आपल्या रिक्षासहीत सकाळी १० वाजता जमावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा