संक्रांतीच्या सणासाठी महिलांची बाजारात रेलचेल वाढली आहे. संक्रांतीला वाण देण्याची पद्धत आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू बाजारपेठेत विक्रीस दाखल झाल्या आहेत. त्यात १० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत वस्तू उपलब्ध आहेत. संक्रांतीचा सण हा प्रत्येक जण वेगळ्याच उत्साहात साजरा करीत असतो. प्रत्येकाच्या चालीरीती वेगळ्या असतात. ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ म्हणत असतानाच काही महिला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करीत असतात. त्याबरोबरच संक्रांतीच्या दिवशी पाच, सात, अकरा, एकवीस याप्रमाणे महिलांना बोलावून वाण देण्यात येते. वाण म्हणजे संक्रांतीनिमित्त भेटवस्तू देणे. अनेक घरांतील महिला संक्रांतीच्या निमित्ताने घरी येणाऱ्या महिलांना भेटवस्तू देत असतात. त्यात लहान वस्तू- ज्या घरात उपयोगी येणाऱ्या किंवा महिलांच्या कामास येणाऱ्या असतात. तसेच कोणी हातरुमलाबरोबर गजरा, तर कोणी प्लॅस्टिकच्या बाऊलमध्ये तिळगूळ घालून देतात.
संक्रांतीला वाण देण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंमध्ये विविध प्रकार बाजारात आले आहेत. त्यात ज्वेलरी बॉक्स, छोटय़ा पर्सेस, मोबाइल कव्हर या प्रकारच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा