चारित्र्यावर संशय घेऊन सासरी होणा-या छळाला कंटाळून मंदा करण काळे या विवाहितेने पेटवून घेऊन आत्महत्या केली. शहरातील कोठी भागात ही घटना घडली.
विवाहितेच्या माहेरच्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात तिचा पती करण काळे याच्यासह प्रकाश काळे, ममता काळे (सर्व राहणार कोठी, स्टेशन रस्ता) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारित्र्याचा संशय घेऊन सासरी तिचा नेहमी छळ होत, होता. या छळाला कंटाळून तिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. जखमी अवस्थेतच तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, येथेच तिचे निधन झाले. पिरा लांडगे (राहणार नेवासे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक बोलमवार करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jul 2013 रोजी प्रकाशित
छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
चारित्र्यावर संशय घेऊन सासरी होणा-या छळाला कंटाळून मंदा करण काळे या विवाहितेने पेटवून घेऊन आत्महत्या केली. शहरातील कोठी भागात ही घटना घडली.
First published on: 11-07-2013 at 01:51 IST
TOPICSछळ
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Married women suicide because of harassment