पर्यावरणाच्या आणि पर्यायाने वसुंधरेच्या संवर्धनासाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘लोकसत्ता’तर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘संकल्प हरित पर्यावरणाचा – २०१३’ या उपक्रमाअंतर्गत ‘अभिनव संकल्प लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या लेखन स्पर्धेतील सर्वोत्तम सात लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी ‘समृद्ध पर्यावरणासाठी नववर्षांचा संकल्प’ अथवा ‘हरित संकल्प २०१३’ या विषयावर ३०० शब्दांचा लेख पाठवावयाचा आहे. वाचकांनी आपल्या लेखासह आपला संपूर्ण निवासी टपाल पत्ता, दूरध्वनी क्रमांक, मोबाइल क्रमांक, ई-मेल आणि जन्मदिनांक पाठविणे आवश्यक आहे. ही स्पर्धा विनाशुल्क असून सर्व गटांतील वाचकांसाठी खुली आहे. वाचकांनी पाठविलेले सर्वोत्तम सात लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. विजेत्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहे. कल्पनेची मौलिकता, पर्यावरण सुधार, सर्जनशीलता आमि कल्पनेची कृतिप्रवणता या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी १९ जानेवारीपर्यंत आपले लेख ‘अभिनव संकल्प स्पर्धा’, ब्रॅण्ड विभाग, दुसरा मजला, एक्स्प्रेस टॉवर, नरिमन पॉइंट, मुंबई – २१ या पत्त्यावर अथवा loksatta.resolution@gmail.com  वर पीडीएफ स्वरुपात पाठवावेत. अधिक माहितीसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत दूरध्वनी क्रमांक ०२२-६७४४०३६९ वर संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा