अखिल भारतीय मारवाडी युवा मंच या मारवाडी समाजाच्या शिखर सामाजिक संस्थेने कोल्हापूरसह संपूर्ण देशाच्या विकासात समाजसेवेच्या माध्यमातून मोलाचे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.
अखिल भारतीय मारवाडी युवा मंचच्या कोल्हापूर मुख्य व कोल्हापूर शहर शाखा, महावीर एज्युकेशन सोसायटी व ललित गांधी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता, त्याप्रसंगी उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते.
युवा मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून महापौर प्रतिभा नाईकनवरे, स्थायी समिती सभापती रमेश पोवार, कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष मनोज राठोड, सेक्रेटरी हितेश राठोड, कोल्हापूर शहराध्यक्ष सुमित ओसवाल, सेक्रेटरी देवेंद्र गांधी, महावीर एज्युकेशन सोसायटीचे सचिव महेश सावंत उपस्थित होते. पाटील म्हणाले, पर्यावरणरक्षणासाठी मारवाडी युवा मंचने वृक्षसंवर्धनाची मोहीम हाती घ्यावी व पायलट प्रोजेक्ट म्हणून एक वॉर्डचे संपूर्ण वृक्षारोपण करावे असे आवाहन केले. तसेच युवा मंचने महाराणा प्रताप पुतळा सुशोभीकरणाची केलेली मागणी मान्य करून आवश्यकता वाटल्यास आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांना आपल्या भाषणात युवा मंचच्या कार्याची माहिती दिली. ९० हजार अपंगांना मोफत कृत्रिम अवयव, ७ हजार शुद्ध पेयजल वितरण केंद्रे, २७० रुग्णवाहिका या उपक्रमांबरोबर उत्तराखंडमधील केलेल्या मदतकार्याची माहिती दिली.
या वेळी उत्तराखंडमधील मदतकार्यासाठी व्हाईट आर्मीचे उज्ज्वल नागेशकर, आंतरराष्ट्रीय अपंग खेळाडू वैष्णवी सुतार यांच्यासह मारवाडी समाजातील लर्न अॅन्ड टर्न, पाश्र्व भक्ती ग्रुप, ऑईस्टर जैन ग्रुप या सामाजिक संस्थांच्या व शैक्षणिक गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन मनोज राठोड यांनी तर सूत्रसंचालन तृप्ती साजणे यांनी केले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा