डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांना ‘मौलाना आझाद पुरस्कार’ घोषित झाला. नवी दिल्ली येथील ऑल इंडिया नॅशनल युनिटी कॉन्फरन्सच्या वतीने राष्ट्रीय शिक्षण दिनी, ११ नोव्हेंबरला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. माजी निवडणूक आयुक्त जी. व्ही. कृष्णमूर्ती संस्थेचे अध्यक्ष आहेत.
गेल्या ३५ वर्षांत डॉ. पांढरीपांडे यांनी शिक्षण व संशोधन क्षेत्रात मोलाचे कार्य केले. कुलगुरूपदाचा पदभार सांभाळल्यापासून विद्यापीठात त्यांनी ‘सेंटर फॉर इनोव्हेटिव्ह आयडिया’, ‘सेंटर फॉर व्होकेशनल स्टडिज, ‘सायन्स पार्क’ ‘सेंट्रल फॅसिलिटी सेंटर’, ‘अ‍ॅकेडॅमिक ऑडिट’, ‘युनिव्हर्सिटी विथ आयटीसी’,‘फिनिशिंग स्कूल’,‘ओपन डे’असे उपक्रम सुरू केले.
पुरस्कार वितरणास लोकसभेचे उपसभापती करिया मुंडा, माजी राज्यपाल डॉ. भीष्मनारायण सिंग, डॉ. नितीन गुप्ता आदी उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader